मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

- Advertisement -
- Advertisement -

Manoj Jarange Patil’s health deteriorated आरोग्य पथक जरांगे यांच्या तपासणीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले आहे मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

मनोज जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, नसता त्यांची प्रकृती आणखी खालावेल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारी यांनी दिली.

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलीय. जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. त्या अनुषंगाने आज आरोग्य पथकाने जरांगे यांची आरोग्य तपासणी केलीय. दरम्यान या तपासणीत जरांगे यांचा बीपी कमी झाल्याच समोर आलंय.

या सोबतच त्यांची शुगर पण कमी झाली असून त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारी यांनी दिलीय. आज त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची तपासणी केली त्यांनंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

दरम्यान जरांगे यांनी उपचार घ्यावे नसता त्यांची प्रकृती आणखीन खलवेल असं डॉ. जयश्री भुसारी म्हणाल्यात. दरम्यान आम्ही त्यांना वारंवार उपचार घेण्यास सांगतोय मात्र जरांगे आपल्या उपोषणावर ठाम असून त्यांनी उपचार नाकारल्याची प्रतिक्रिया डॉ. जयश्री भुसारी यांनी दिलीय .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles