निलेश लंके खासदार झाले

- Advertisement -
- Advertisement -

ahmednagar loksabha election result nilesh lanke ncp wins अहमदनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी कडवी झुंज देत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा दणदणीत पराभव केला. त्यांनी सुजय विखे यांचा  28 हजार 929 मतांनी पराभव केला.

भारतीय जनता उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच  आघाडी मिळवली होती. मात्र दहाव्या फेरीनंतर विखे यांचे लीड कमी होण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये लंकी यांचे मतदानाची आकडेवारी वाढतच होती. शेवटच्या फेरी अखेर निलेश लंके यांना सहा लाख 24 हजार 7 97 इतकी मते मिळाली. त्यांची प्रतिस्पर्धी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाच लाख 95 हजार 868 इतकी मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकाची मते अपक्ष उमेदवार आलेकर गोरक्ष दशरथ यांना 44,597 तर बहुजन आघाडी चे उमेदवार दिलीप खेडकर यांना 13749 मते मिळाली. 

एकूण झालेल्या मतदानापैकी 1653 मतदान ही बात ठरवण्यात आले. तर 3282 मतदारांनी नोटाला पसंती दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles