Homeताज्या बातम्यामालेगावमध्ये एमआयएमच्या माजी महापौरांवर अज्ञातांनी झाडल्या 3 गोळ्या

मालेगावमध्ये एमआयएमच्या माजी महापौरांवर अज्ञातांनी झाडल्या 3 गोळ्या

https://we.tl/t-HMcpDEtlPS

नाशिक जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी माजी महापौर आणि एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात अब्दुल मलिक गंभीर जखमी झाले आहेत.

हाताला, पायाला तसेच बरगडीत गोळी लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अब्दुल मलिक हे मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून तीन हल्लेखोर आले. त्यांनी मलिक यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

या गोळीबारात मलिक यांच्या हाताला, पायाला तसेच बरगडीत गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेनंतर एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी रुग्णालयात जाऊन मलिक यांची भेट घेतली. मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप आमदार मुफ्ती यांनी केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याची केली त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments