बॉलीवूड अभिनेता,निर्माता राजीव कपूर अनंतात विलीन

- Advertisement -
- Advertisement -

 

मुंबई दि 9 फेब्रुवारी, प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेता, निर्माता राजीव कपूर यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने चेंबूर येथील इंलॅक्स रुग्णालयात आज निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्यावर चराई स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजीव कपुर यांना सकाळी छातीत दुःखत असल्याचे त्यांनी आपल्या पत्नी व पुतण्या रणवीर कपुर यांना सांगितले असता त्यांनी तत्काळ येऊन त्यांना उपचाराकरिता अभिनेते  रणवीर कपूर यांनी इंलॅक्स  रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचे आज निधन झाले. चेंबूर परिसरात त्यांच्या निधनाची माहिती कळताच परिसरात शोकाकुल झाले होते.

अभिनेते राजीव कपूर यांचा जन्म 25 ऑगस्ट 1962 रोजी मुंबई येथील चेंबूर या ठिकाणी झाला होता. त्यांचे शिक्षण चेंबूर येथील ओएलपीएस मध्ये झाले होते. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरवातीला  सुरुवात केली त्यांनतर आरके बॅनरखाली ‘बिवी ओ बीवी’ चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रावेळ यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणू न काम केले होते त्याची काम करण्याची पद्धत पाहून अभिनेते राज कपूर यांनी त्यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून स्वत: कडे काम करण्याची संधी दिली होती.

हेही वाचा:चिचोंडी पाटीलच्या सरपंचपदी मनोज कोकाटे तर उपसरपंचपदी कल्पना ठोंबरे

आरके बनरखाली 1985 रोजी बनविण्यात आलेल्या राम तेरी गंगा मैली चित्रपटामुळे निर्माण झाली.त्यांनी एक जान हैं हम,
आकाश, प्रेमी मुलगा, घाटीर, हम तो चले परदेस, अंगारे आणि नाग नागीन यांच्या मुख्य चित्रपटांमध्ये काम केले होते तर निर्माता म्हणून आ अब लॉट चैलेन, प्रेमग्रंथ, हिना,
बनविले.

राजीव कपूर यांची कारकीर्द

अभिनेते राजीव कपूर यांच्या निधनाची बातमी पसरताच त्याच्या चाहत्यांनी चेंबूर येथील इंलक्स रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती.परंतु पोलीसानी आव्हान करून घरी जाण्याची विनंती केल्याने परिसरात गर्दी कमी कमी झाली त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी चेंबूर येथील पंजाबवाडी परिसरात त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती व अनेक अभिनेत्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले त्याचप्रमाणे राजीव कपुर यांचे अंत्यसंस्कार चरई स्मशानभूमीत करण्यात आले यावेळी त्यांचा परिवारातील सदस्य रणबीर कपूर व रंधवीर कपूर तसेच अभिनेता दिलीप ताहिलांनी व त्यांच्या चाहत्यांनी देखील स्मशानभूमी परिसरात देखील गर्दी केली होती.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles