आष्टीत तहसीलदारांची गाडी जळाली कि जाळली ?

- Advertisement -
- Advertisement -

 

 

आष्टी

beed news ashti talsildar vehicle burned आष्टी येथील तहसीलदार प्रमोद गायकवाड  यांच्या गाडीला रात्री अडीच वाजता आग लागल्याची घटना घडली. दरम्यान ही आग लागली कि लावली हा प्रश्न आहे. सध्या मराठा आरक्षण आंदोलन सुरु आहे. गावोगावी आरक्षणासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरु आहे .मात्र काही ठिकाणी जाळपोळ च्या घटना घडत आहेत. अशातच आष्टीचे तहसिलदार यांची गाडी पेटल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे .

Do not get installment of Namo Shetkari Yojana. नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही हे काम करा

नगर रस्त्यावर जुन्या  तहसिलदार निवास समोर  ही गाडी लावण्यात आली होती. तहसिलदार यांची गाडी आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक पेटली. या गाडीने पेट घेतल्याची माहिती मिळताच तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक खेतमाळस यांना संपर्क साधत घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी नगराध्यक्ष जिया बेग यांनी नगर पंचायतच्या अग्नीशामक गाडीला पाचारण करत आग विजविण्यासाठी प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली मात्र ही गाडी पूर्ण भस्मसात झाली आहे. मात्र आष्टी येथील तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या गाडीला आग लावली की, आग लागली याचा अजून तपास पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles