बीड दि 7 प्रतिनिधी
या गावात दिवाळी होती,तुम्ही म्हणाल की आता दिवाळी कशी पण या गावासाठी दिवाळीच साजरी झाली, गावातील
झाडांना विद्युत रोषणाई ,रंगीबेरंगी लायटिंग आणि उंच उंच होर्डिंग,फटक्यांची आतषबाजी हे सर्व येथे पहावयास मिळालं .जणू काही दिवाळीच ,सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे Dhananjay munde यांच्या जन्मगावात नाथऱ्याच्या ग्रामस्थांनी आपल्या भूमिपुत्राचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.
मंत्री धनंजय मुंडे Dhananjay munde यांची बलात्काराच्या आरोपामधून सुटका झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचे भव्य स्वागत होत आहे.फिनिक्स पक्षाप्रमाणे मुंडे यांनी कामाचा आणि कार्यक्रमांचा सपाटा सुरू केला आहे.
त्यांच्या स्वागतासाठी नाथरा गाव सजले होते.गावाकडे जाणाऱ्या 4 किमी रस्त्यावर धनंजय मुंडे Dhananjay munde यांचे मोठे कट आऊटस उभारण्यात आले होते.जागोजागी त्यांची छबी असलेले स्वागताचे बॅनर झळकत होते.गावात मोठा शामियाना उभारण्यात आला होता.गावातील झाडांवर रंगीबेरंगी लायटिंग करण्यात आली होती .एक टन वजनाचा हार धनंजय मुंडे Dhananjay munde यांना घालण्यात आला.
यावेळी आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या सिरसाठ, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, सदस्या सुषमाताई मुंडे, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, गोविंद फड आणि मोठ्या संख्येने महिला, जेष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पालक मंत्री धनंजय मुंडे Dhananjay munde म्हणाले , माझा नाथ्रा गावात जन्म झाला असून याचे अनेक ऋण आहेत ते अनेक जन्म आपल्यावर असेच रहावे, असे भावोद्गार श्री. मुंडे यांनी याप्रसंगी काढले. ते म्हणाले, गावकऱ्यांनी जो विचार केला नाही तो विकास येणाऱ्या चार वर्षात करून दाखवणार आहे. तर गावाचं नाव राज्यात केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पालकमंत्री श्री मुंडे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा:पाटोद्याच्या आणखी एका पैलवानाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
[…] […]
[…] हेही वाचा:नाथऱ्याच्या गावकर्यांनी क… […]