कड्यात रंगला चिमुकल्यांचा रिंगण सोहळा

- Advertisement -
- Advertisement -

कडा

kada ashadhi wari palakhi विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला। जय जय राम कृष्ण हरी च्या गजरात चिमुकल्यांनी ठेका धरला आणि रिंगण सोहळा रंगला.

कडा येथील अमोलक जैन शिक्षण संस्थेतील मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला बाल वारकऱ्यांचा दिंडी रिंगण सोहळा पार पडला.

विद्यालयात पालखी चे पूजन करून आणि विठ्ठलाची आरती करून पालखीला प्रारंभ झाला. शाळेतील प्रांगणात रिंगण सोहळा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ वाजवत, हलगीचा आवाज करत आनंद लुटला.

या दिंडी सोहळ्यासाठी चिमुकल्यांनी वारकऱ्यांचा वेष परिधान केला होता. तर भगव्या पताका खांद्यावर घेत दिंडीला प्रारंभ झाला. दिंडीत विठ्ठल रखुमाई ची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर कडा गावातून दिंडी काढण्यात आली.
यामध्ये  चंदनमल भळगट  प्राथमिक शाळेचे चिमुकले सहभागी झाले होते. दिंडीच्या अग्रस्थानी पालखी तयार करण्यात आली होती.चौकाचौकात लेझीम पथकाने पाऊल खेळत, फुगडीचा आनंद लुटला.

या साठी विद्यालयाचे शिक्षक एम इ शिकारे, सुहास गोले, कृष्णा जाधव, प्रकाश सरडे, भीमाशंकर मराठे, हंबर्डे सर, संजय नाथ , धलपे सर,  जाजडा मॅडम, शिक्षिका भोस मॅडम, गोले मॅडम, कर्डीले मॅडम, जरे मॅडम, भंडारी मॅडम, मुंडे मॅडम, यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles