काय आहे जिल्ह्यातील मनाई आदेश?

  बीड,
beed news today जिल्हयात दि. 24 मार्च 2023 पासून मुस्लीम रमजान मासारंभ सुरु झाला असून दि. 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि दि. 22 एप्रिल 2023 रोजी रमजान ईद व अक्षय तृतीया सण साजरे होत असून जिल्ह्यात राजकिय हालचाली व घडामोडी मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे, रास्ता रोको यासारखे आंदोलने होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यास्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
beed news today कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी beed जिल्ह्यात कलम 37 (1) (3 ) अन्वये 13 एप्रिल 2023 रोजी रात्री 12 वाजेपासून ते 26 एप्रिल 2023 रोजीच्या रात्री 24.00 वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी संतोष राऊत बीड यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.
  या कालावधीत काढण्यात येणा-या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यपेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येण्यास निर्बंध आहे.
शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यां व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास खालील बाबीस मनाई करण्यात आली आहे.
या अन्वये शस्त्र, सोटे ,काठी, तलवार, बंदूक, लाठया, काठया, कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके, दगड, किंवा इतर क्षेपाणस्त्रे, शरीरास इजा होणा-या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडांबनात्मक नकल, सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षिता धोक्यात येईल, किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणतीही वस्तू जवळ बाळगू नये.
          जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचणार असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचणारी असेल, व्यक्तीच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती,किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन यासाठी मनाई आहे.
पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही, मिरवणूका मोर्चे काढता येणार नाही.
        कोणताही मोर्चा, सभा, मिरवणूक व तत्सम कोणतीही कृती करण्यासाठी त्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिका-यांची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहील. तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस लागु राहणार नाहीत व अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजूरीशिवाय 15 दिवसापेक्षा जास्त मुदतीपर्यंत अंमलात राहणार नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles