अहमदनगर जिल्ह्यात 705 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 82.73 टक्के मतदान

- Advertisement -
- Advertisement -

जिल्ह्यात 705 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 82.73 टक्के मतदान

अहमदनगर दि 16 जानेवारी,प्रतिनिधी

जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात सरासरी टक्के ८२.७३टक्के मतदान झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांनी दिली. ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी- कर्मचारी यांनी चोख नियोजन केल्याने जिल्हयात शांततेत मतदान पार पडले.
जिल्ह्यात अकोले तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीसाठी ८१.४०टक्के, संगमनेर -९० ग्रामपंचायतीसाठी ८४.१३टक्के,
कोपरगाव- २९ ग्रामपंचायती ८२.१८टक्के,श्रीरामपूर- २६ ग्रामपंचायती ८०.७७ टक्के,राहाता -१९ ग्रामपंचायती ८०.२०,राहुरी -४४ ग्रामपंचायती ८१.३२,
नेवासा- ५२ ग्रामपंचायती ८१.५६,
नगर-५६ ग्रामपंचायती ८१.२४,
पारनेर-७९ ग्रामपंचायती ८४.७७,
पाथर्डी- ७५ ग्रामपंचायती ८२.७,
शेवगाव- ४८,ग्रामपंचायती ८३.४०,
कर्जत-५४ ग्रामपंचायती ८५.००,
जामखेड-३९ ,ग्रामपंचायती ७७.५०,
आणि श्रीगोंदा तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींसाठी २५६ मतदारांनी हक्क बजावला.त्यामध्ये दोन तृतीय पंथीयांचा समावेश आहे.(ग्रामपंचायतींसाठी)

जिल्हास्तरावरुन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी समन्वयन केले तर प्रत्येक तालुक्यात राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी तथा तहसीलदार यांच्या प्रत्यक्ष निगराणीत मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीसाठी पाचशेहून अधिक अधिकारी तर पंधरा हजाराहून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी ही प्रक्रिया अतिशय चोखपणे पार पाडली.(ग्रामपंचायतींसाठी)

हेही वाचा :मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles