shivjayanti 2023 “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चे औचित्य साधून राज्यातील तरुणाई तसेच समाजातील सर्वच नागरिकांना स्फुर्तीदायक असणारे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत rajyageet म्हणून स्विकारण्यात आले आहे.
या राज्यगीताचे शब्द व गायलेल्या तसेच वाद्यधून स्वरुपातील गीतांची ऑडिओ क्लीप तसेच या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाच्याच्या शासन निर्णयाची प्रत शासनाच्या या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर गीत दि. 19 फेबु्वारी 2023 पासून महाराष्ट्र राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात येत आहे. या शासन निर्णयातील राज्यगीत गायन/वादन या संदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना वरील संकेत स्थळावरील शासन निर्णयात दिल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यात मोठा उत्साह आहे. चौकाचौकात महाराजांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. shivjayanti banner तसेच मोठे होर्डिंग उभारण्यात आले आहेत. महाराजांची महती सांगण्यासाठी shivjayanti speech in marathi शिवव्याख्याते यांचे व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र राज्यगीत ऐकण्यासाठी इथे क्लिक करा