मुंबई दि 14 जानेवारी, प्रतिनिधी
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर याच महिलेविरुद्ध भाजपचे उपाध्यक्ष माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.
या संदर्भात कृष्णा हेगडे यांनी आंबोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना तक्रार अर्ज देऊन या महिलेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, श्रीमती रेणु शर्मा या मला सतत फोन करतात, एसेमेस करतात, माझ्याकडे 2010 पासुन तिच्याशी संबंध ठेवायला जबरजस्तीने पाठपुरावा करीत आहेत. सादर प्रकार 2010 पासुन सुरु आहे. हा छळ भीतीदायक पाठलागाच्या स्तरापर्यंत गेला होता.
माझ्या सूत्रांकडून मला असं समजलं होतं कि सदर महिला हि संशयास्पद आणि फसवणूक करणारी असुन ती अश्याप्रकारे सापळा लावते. मी तिला भेटण्याचे पुर्णपणे टाळले.
मला अशी माहिती प्राप्त झाली आहे कि या महिलेने अनेक पुरुषांना अश्या सापळ्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसुल केली आहे.
मुंबई पोलिसांनी कृपया त्याबाबतचा तपास करावा.
हा छळ, मेसेज करणे, फोन करण्याचा प्रकार 2015 पर्यंत सुरु होता पण तिला भेटण्याचे मी ठामपणे टाळले.
मी तिला स्पष्टपणे सांगितले कि मला तिला भेटण्यात आणि तिला हव्या असलेल्या पद्धतीने संबंध ठेवण्यास अजिबात इच्छुक नाही.
एव्हढेच नाही तर 6 जानेवारी 2021 आणि 7 जानेवारी 2021 ला सुद्धा तिने परत मला व्हाट्स अँप वर नंबरवरून एसेमेस पाठविले. पण मी तिला एक थंब्स अप ची इमोजी पाठविण्यावयतिरिक्त काहीही रिप्लाय/ प्रतिसाद दिला नाही. दोन दिवसांपूर्वी तिने मंत्री धंनजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप पाहुन मला धक्काच बसला.
आणि मग मी आपल्याला श्रीमती रेणु शर्मा बद्दल कळविण्याची निर्णय घेतला.
आज त्यांनी धंनजय मुंडेंना टार्गेट केलं आहे, दोन वर्षांपुर्वी कदाचित त्याजागी मी राहिलो असतो. आणि उद्या कदाचित आणखी कोणी असु शकेल.
हि लोकांना जाळ्यात ओढुन, ब्लॅकमेल करणे खंडणी उकळणे अशी सुनियोजित कार्यपद्धती आहे, माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे कि या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येऊन संपुर्ण तपास करून प्रकरण लॉजिकल कॉन्क्लुजन पर्यंत नेण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा:अहमदनगर जिल्ह्यात 705 ग्रामपंचायत साठी मतदान
[…] हेही वाचा :भाजपचे माजी आमदार कृष्णा हे… […]