beed child andolan या साठी केले विद्यार्थ्यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बीड
beed child andolan पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील शिंदे वस्ती वरील शालेय विद्यार्थ्यांनां आणि ग्रामस्थांना थर्माकोलवरून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे.
या वस्तीवरील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि ग्रामस्थांना पाण्यातून जाण्यासाठी तरफा देण्यात आले होते .मात्र काही दिवसापूर्वी हे तरफा अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकले . त्यामुळे या विध्यार्थ्यांना थर्मोकोल शिवाय पर्याय राहिला नाही.
तहसिलप्रशासनाच्या जाणीवपुर्वक हलगर्जीपणामुळेच आली असून संबधित प्रकरणात तहसिलदार रूपाली चौगुले सह ईतर जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच उपविभागीय आधिकारी व तहसिलदार यांनीच शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांच्या वारंवार निवेदन,आंदोलनानंतर सुद्धा कोणतीही कारवाई न करता वेठीस धरले असुन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातच घेण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१९ डिसेंबर सोमवार रोजी शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांसह चप्पु घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी चप्पु चलाओ आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युनुस च-हाटकर, शेख मुबीन,सय्यद आबेद,मुश्ताक शेख ,हमीदखान पठाण, बलभीम उबाळे सुखदेव सानप , निलेश शिंदे,बाबासाहेब शिंदे,नामदेव शिंदे , परमेश्वर शिंदे,भरत बागडे,पांडु बागडे,विश्वनाथ शिंदे,सुरेखा शिंदे,स्वाती शिंदे,उषा शिंदे,संगीता बागडे,रखमाबाई शिंदे,वत्सला शिंदे,ताराबाई शिंदे व शाळकरी मुले सहभागी होते. निवेदन जिल्हाधिकारी बीड राधाबिनोद शर्मा यांना देण्यात आले.
beed child andolan मतदानावर बहिष्कार व तराफे जाळल्यानंतर सुद्धा तहसिलदार यांची घटनास्थळी भेट नाही
१३ ऑक्टोबर रोजी जलसमाधी आंदोलन दरम्यान २ दिवसात अडवणुक केलेला रस्ता खुला करून देण्यात येईल या तहसिलदार रूपाली चौगुले यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले परंतु २ महिने उलटुन सुद्धा कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळेच २ डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत जिल्हाप्रशासनाला निवेदन दिल्यानंतर दि.११,डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञाताने तराफे जाळल्यानंतर सुद्धा घटनास्थळी भेट नाही एकंदरीतच तहसिलदार रूपाली चौगुले यांच्या संवेदना बोथट झाल्या असून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
beed child andolan जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात यावी:- डाॅ.गणेश ढवळे
तहसिलदार रूपाली चौगुले यांचे शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष आणि दि.१६ डिसेंबर रोजी उपविभागीय आधिकारी प्रमोद कुदळे यांनी आंदोलनकर्ते यांना आढावा बैठकीस बोलावून कोणतीही पुर्व सुचना न देताच बैठकीस गैरहजर राहणे तसेच ग्रामस्थांसमोर त्यांची दखल न घेताच निघून जाणे ही आंदोलनकर्ते यांची हेळसांड असून त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नसल्यामुळेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातच आढावा बैठक घेण्यात यावी.
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अड.प्रज्ञा खोसरे यांची मोलाची मदत
बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य सदस्य अड.प्रज्ञाताई खोसरे यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या सोबत बैठक घेऊन शिंदेवस्तिवरील शालेय विद्यार्थांवर जीवघेणा प्रवास करावा लागत असून मुलामुलींच्या शिक्षणासाठी दळणवळणाची सोय करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली असून त्यांच्या समवेत गुलरूखजहीन किशवरूद्दीन शेख उपस्थित होत्या.