अकोले,
सकाळी सात वाजता दूध घेऊन जाणाऱ्या सौ. अंजनाबाई राजाराम भोईर या बांगार वाडी गावातून मधल्या रस्त्याने राजूर कडे निघाल्या रस्त्यात जड झाले म्हणून त्यांनी किटली ठेवली नी रस्त्याच्या कडेला उतरल्या त्याच वेळी दबा धरून बसलेला बिबट्या अचानक किटली जवळ आला नी त्यांनी मोठ्याने जांभळी दिली.
त्याच्या आवाजाने अंजनाबाई अर्धमेल्या झाल्या त्यांनी मागचा पुढचा विचार न करता रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत स्वतःला झोकून दिले .अर्धा तास त्या मोठ्या खड्ड्यात तसीच पडून राहिल्या बिबट्याने किटली स जोराचा फटका मारत व तिच्यावर पाय ठेवून दूध सांडून दिले व तो रस्त्याच्या विरुद्ध दिशेला निघून गेला अर्धा एक तासाने अंजनाबाई शुध्दीवर आल्या त्यावेळी त्याच्या कंबरेला मार लागला होता . त्या त्याचं अवस्थेत उठून रस्त्यावर आल्या त्यावेळी दूध रस्त्यावर सांडलेले होते .
त्यांनी किटली घेऊन जखमी अवस्थेत घर गाठले नी घरच्यांना घडलेला प्रकार कथन केला मग दवाखान्यात नेऊन त्यांचेवर औषधोपचार करण्यात आले .याबाबत वनविभागाला कळविण्यात आले आहे.
अतिवृष्टी च्या अनुदान मिळावे यासाठी रस्ता रोको