अकोले,ता.१० प्रतिनिधी
अकोल्यातील टाकळकर वाडा म्हणजे एक विद्यापीठच .
या विद्यापीठात पुरुषोत्तम मामा व प्रमीलाताई मामी यांचे निवास मायेची ऊब ,नेतृत्व ,कुशल संघटक म्हणून प्रमिला मामी परिचित होत्या ,सर जाती धर्माचे लोक ,भाडेकरू या वाडयात गुण्या गोविंदाने राहायचे .
पुरुषोत्तम टाकळकर मामा गेल्यानंतर मामींनी सर्वांना आपल्या तीन मुलाप्रमाणे सांभाळले नव्हे तर त्यांचे दुःख वाटून घेतले .
त्यांच्या या प्रेमामध्ये आपुलकी ,जिव्हाळा,प्रेम ओतप्रोत भरलेले .पत्रकारांचा प्रकाश टाकळकर यांच्यामुळे राबता असायचा मामी आजींच्या हातचा नाष्टा सर्वांना अमृततुल्य वाटायचा,वाड्यातील महिला मामी आजी,पणजी आजी म्हणून प्रमिला टाकळकर यांना आदराने हाक मारून आपल्या व्याथा,प्रश्न सोडवून घ्यायच्या त्यामुळे वाड्यातील सर्वानाच त्यांच्या विषयी देवा इतकीच श्रद्धा होती .
शनिवारी पहाटे त्यांनी स्वतःच्या हाताने चहा करून पिला त्या स्वाभिमानी होत्या .९२ वर्षाच्या असतानाही त्यांनी हातात काठी घेऊन आधार घेतला नाही .
स्वतःचे काम स्वतः करत दोन मुले , व एक मुलगी तेही संस्कारक्षम रोज पहाटे उठून त्यांचा दिनक्रम सुरू असायचा मात्र घरात पाय घसरुन पडल्या नी त्याच्या मांडीच्या खुब्याला मार लागला आजारपणात त्या म्हण्याच्या मी एकादशीला जाणार आणि आश्चर्य काय एकादशी दिवशी पहाटेत्यांचे दुःखद निधन झाले .नी वाड्यातील माणसे ,(बाया बापडे त्यांच्या मायेच्या ओलाव्यानीओक्साबोक्शी रडले नी ते पाहून वाडा ही गहिवरला ……
अकोले येथील टाकळकर वाडा नव्हेतर विद्यापीठ म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली,त्या टाकळकर विद्यापीठाच्या कुलमाता म्हणून सर्व परिचित असलेल्याश्रीमती प्रमिला (मामी) पुरुषोत्तम टाकळकर (रा अकोले,वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठपत्रकार तथा माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर,इंजिनिअर प्रशांत टाकळकर,बँक ऑफमहाराष्ट्र च्या सेवा निवृत्त शाखाधिकारी प्रतिभा सोमण टाकळकर यांच्या त्या मातोश्री होत.प्रवरा नदी काठी आज दुपारी त्यांच्यावर अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आ. डॉ. किरण लहामटे,प्राचार्य डॉ अनिल सहस्रबुद्धे,माजी प्राचार्य तथा जेष्ठपत्रकार शांताराम गजे,भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे,निवृत्त नायब तहसीलदार अनिल सोमणी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर अंत्यविधी साठी उपस्थित होते.
हेही वाचा :४० पैकी ३२ नवीन कोरोना बाधित