बीड
beed diwali vacation मराठवाडा शिक्षक मतदार संघातील शिक्षक आमदार विक्रम काळे जागे झाले असून त्यांच्या पत्राच्या आधारावर शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी कार्यवाही करत बीड जिल्ह्यातील शाळांच्या सुट्ट्या कमी करून 19 दिवसावर आणल्या आहेत. या बाबतचा उपसंचालक औरंगाबाद यांचा आदेश सुट्ट्या सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणी करण्यासाठी आणि या निमित्ताने विभागातील सर्व शाळांमध्ये संपर्क करण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत बदल करायला शिक्षण विभागाला दिनांक 12 रोजी पत्र दिले. दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.diwali vacation 2022
सासूचे २५ तोळ्याचे दागिने चोरताना जावई cctv त कैद
बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गेल्या महिन्यात परिपत्रक काढून बीड जिल्ह्यात दिनांक 17 आॅक्टोबर पासून दिनांक 7 नोव्हेंबर रोजी पर्यन्त दिवाळीच्या deepawali festival 2022 सुट्टी जाहीर केलेल्या आहेत. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती ची सुट्टी जोडून आल्याने दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा 9 नोव्हेंबर रोजी भरणार होत्या.
पण आमदार विक्रम काळे यांनी राजकीय भुमिका डोळयासमोर ठेवून एक आठवडा सुट्टी कमी करुन बीड जिल्ह्यातील शिक्षकांवर अन्याय केल्याची भावना सर्व शिक्षकांत व्यक्त होत आहे.
दिवाळीच्या सणाचा उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील schools in beed शाळांच्या दिवाळीच्या सुट्टया बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी काढलेल्या परिपत्रक प्रमाणे दिल्या पाहिजेत, अशा भावना बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षकांत व्यक्त होत आहेत.