केज दि 9 प्रतिनिधी
50 हजाराची लाच घेताना तलाठ्यासह सहायकास केज तहसील आवारात रंगेहात पकडल्याची घटना आज दुपारी घडली.बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
पाझर तलावात संपादित जमिनीसंबधीत क्षेत्र कमी दाखविण्यासाठी या तलाठ्याने 1 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती सहाय्यकाकडून 50 हजार रुपये स्वीकारताना ‛एसीबी’च्या पथकाने रंगेहाथ पकडले.
बीडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाडवी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
दोघा लाचखोराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तलाठ्यासह सहाय्यकास बीडच्या ‛एसीबी’च्या पथकाने येथील तहसीलच्या आवारातील टाकळी सजाच्या (अनधिकृत) कार्यालयाजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पडकले आहे.
दयानंद शेटे (वय 50 ) असे लाचखोर तलाठ्याचे तर सचिन घुले (वय 31)असे पकडलेल्या सहाय्यकाचे नाव आहे.
हेही वाचा :पिक अप दुचाकीच्या धडकेत एक ठार दोन जखमी
[…] […]