dharashiv teacher agitation मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव मोर्चाला शिक्षकांचा उदंड प्रतिसाद
धाराशिव
dharashiv teacher agitation शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी, निकषपात्र विनाअनुदान शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रा नुसार अनुदान देवून शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी, कंत्राटी प्राध्यापकांना नियमित
प्राध्यापक म्हणून मान्यता देण्यात याव्यात, शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना 10,20,30 या तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगा नुसार वेतनेत्तर अनुदान द्यावे या व इतर मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाने मराठवाडाभर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.
त्यातील पहिला नांदेड धडक मोर्चा 28 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. त्यास शिक्षकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादा नंतर रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा शिक्षक संघाने धाराशिव अर्थात उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर दुसरा
धडक मोर्चा काढला. या मोर्चातही प्रचंड संख्येने सहभागी होऊन शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली एकजूट दाखवून दिली. या मोर्चात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
मराठवाडा शिक्षक संघाचे माजी विभागीय सरचिटणीस तथा मार्गदर्शक व्ही. जी. पवार, उस्मानाबाद मराठवाडा शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष पी.एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद मराठवाडा शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष जे.एस.
शेरखाने, जिल्हा सचिव व्ही.एस. मायाचारी, केंद्रीय कोषाध्यक्ष ए. बी. औताडे, केंद्र कार्यकारिणी सदस्य, तिर्थकर एस. ए., फारूक जमादार यांचेसह सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुका आणि शहर शाखांनी मोर्चाची अतिशय उत्तम तयारी
केली. मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, माजी सरचिटणीस व्ही जी पवार उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष जे. एस. शेरखाने, जिल्हा सचिव सचिव व्ही.एस. मायाचारी, केंद्रीय कोषाध्यक्ष ए. बी.
औताडे, केंद्र कार्यकारिणी सदस्य, तिर्थकर एस. ए., फारूक जमादार, मार्गदर्शक पी.एस. शिंदे, डी.जी.तांदळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
तिसरा धडक मोर्चा रविवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी लातूर येथे होणार आहे अशी माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी सांगितले.