शंकर होमकर
रायगड दि 9
सातारा येथून लग्न आटोपून पोलादपूर येथील कुडपण येथे येत असताना वऱ्हाडाचा टेम्पो खोल दरीत कोसळला.या अपघातात 3 जण ठार झाले असून 43 जण जखमी झाले आहेत.
अपघातातील 43 जखमींवर पोलादपूर येथील प़ाथमिक के़द़ात उपचार सुरू आहेत. तर 6 जखमींना नवी मुंबई आणि अलिबाग येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे अशी माहिती रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कुडपण धनगर वाडी येथे लग्नाच्या वर्हाडाचा ट्रक दरीत कोसळल्याची घटना घडली आहे
44 जखमींपैकी 12 जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांना प्रथमोपचार करून रत्नागिरीला पाठविण्यात आले आहे.
एका व्यक्तीला गुडघ्याला फॅक्चर आहे.त्यास महाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील कोंडूशी गावातील नवरी मुलगी आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी येथील नवरदेव वऱ्हाडींसह निघाला होता.
सातारा जिल्ह्यातील कोंडूशी गावातील नवरी मुलगी आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी येथील नवरदेव वऱ्हाडींसह निघाला होता.
पोलादपूर तालुक्यातील खडपी गावातून लग्नाचे वर्हाड कुडपण येथे गेले होते. लग्न लावून परत येताना अपघात होवून सुमारे 150-200 फूट खाेल दरीत ट्रक कोसळला. कुडपण धनगरवाडी जवळ एका वळणावर हा अपघात झाला. पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता..ग्रब्रीएल पध्दतीचे तकलादू संरक्षक कठडे असल्याने कठड्यासह ट्रक दरीत कोसळला
या घटनेनंतर स्थानिक प्रशासन यंत्रणा,आरोग्य यंत्रणा पोलीस यंत्रणा महाड, कोलाड, महाबळेश्वर रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले.
आतापर्यंत ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर येथे 43 जखमींना दाखल केले असून तीन जणांचा मृत्यू झाला आला आहे.
सहा जखमींना एमजीएम, कळंबाेली आणि जिल्हा रुग्णालय,अलिबाग या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
पालकमंत्री आदिती तटकरे ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर या ठिकाणी पोहोचल्या आहेत. स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने, आरोग्य यंत्रणेने परिस्थिती उत्तमरित्या हाताळली आहे.
44 जखमींपैकी 12 जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांना प्रथमोपचार करून रत्नागिरीला पाठविण्यात आले आहे.
एका व्यक्तीला गुडघ्याला फॅक्चर आहे.त्यास महाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यामध्ये मृत झालेल्यांची नावे तुकाराम झोरे वय 40, कुंभारडे
हरिश्चंद्र भावेश होगडे 22, तुळशी धनगरवाडी,विठोबा भागोशी झोरे, 65, खवटी अशी आहेत.
हेही वाचा :जामखेड मध्ये घुबडाची तस्करी करणारी टोळी पकडली