Homeताज्या बातम्याअपघातग्रस्त टॅंकरमधून नागरिकांनी लुटले तेल

अपघातग्रस्त टॅंकरमधून नागरिकांनी लुटले तेल

अंभोरा,
ashti tankar accident पलटी झालेल्या तेलाच्या टॅंकर मधील तेल नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी करत मिळेल तसे तेल लुटले.ही घटना नगर जामखेड रस्त्यावर वाघळूज घाटात घडली.

अंभोरा ते वाघळूज दरम्यान असलेल्या घाटात नगरहून जामखेड च्या दिशेने जाणाऱ्या टॅंकर ला अपघात झाला.रस्त्यावरून टॅंकर खाली गेल्याने यातील ड्रायव्हर बेशुद्ध पडला ,टॅंकर पलटी झाल्याने टॅंकर मधून तेल गळत होते.सायंकाळी हा अपघात झाल्यानं अंधाराचा फायदा घेऊन नागरिकांनी मिळेल त्या पद्धतीने ,ड्रम, हांडे घेऊन तेल मिळेल तसे तेल लुटण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे या टॅंकर भोवती मोठी गर्दी झाली होती.उशिरा टॅंकर उभा करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments