छत्रपती संभाजीनगर,( औरंगाबाद )
eknath shinde news मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर ) दौऱ्यावर असुन आज सकाळी ११ः३० वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टीची आढावा बैठक घेतली.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही आज अतिवृष्टीचा आढावा घेतला, काही जणांचे पावसामुळे मृत्यू झाले, त्यांच्या मदतीचा आढावा घेतला.
येणाऱ्या तीन दिवसात राज्यभर शेतपीकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत, शेतपीकांचे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देऊ, शेतकऱ्यांना हे नविन शिवसेना- भाजप युतीचे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेणार असे सांगितले.
तसेच सध्या औरंगाबाद शहरवासियांना ५ ते ७ दिवसानंतर पाणी मिळते, त्यांना किमान दिवसाआड पाणी मिळण्यासाठी जुन्या ७०० मिमी जलवाहिनीसाठी दोनशे कोटी रूपयांचा निधी आढावा बैठकीत मंजूर केला आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे eknath shinde news today यांनी दिली. त्यामुळे शहरवासियांना ७५ एम एल डी पाणी अधिक मिळणार आहे असे ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगरात ( औरंगाबाद ) येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
शेतकऱ्यांचा जीव मोलाचा आहे; शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी राज्यसरकार कटीबद्ध आहे. यापुढे शेतकरी आत्महत्या करणारच नाही यासाठी अल्प, मध्य व दीर्घ कालावधीसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात याव्या असे निर्देश विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Sanjay raut latest update शिवसेना खासदार इडीच्या ताब्यात
खड्डेयुक्त रस्त्याचा प्रश्न आजही कायम असून शहरी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी दर्जेदार रस्त्यांची कामे करणार आहोत. जवळपास सातशे किमी रस्त्यांचे काम सुरु होणार असून सात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
मुंबईतील रस्ते सिमेंटचे होणार असुन दिड दोन वर्षानंतर शोधूनही रस्त्यांवर खड्डे कोणाला सापडणार नाही अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी पत्रकार eknath shinde livenews परिषदेत दिली. केंद्र सरकारची आपल्या सरकारला मोठी मदत मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला आश्वासन दिले की, निधी कमी पडू देणार नाही.
केंद्र व राज्य शासनाच्या समान वाटा असलेल्या योजनांना चालना देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. परभणी मध्ये समांतर पाण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे. तसेच नांदेड ते जालना समृद्धी महामार्ग देखील करायचा आहे. मराठवाड्यात मंत्री मंडळ बैठक प्रथा खंडित झाली आहे. याबाबत विचारले असता मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठकीचा विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले.
eknath shinde news अर्जुन खोतकर यांच्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
अर्जुन खोतकर हे ईडीच्या दबावाखाली आपल्या गटात आले यांवर भाष्य करताना, ईडीच्या कारवाईच्या भितीने आमच्याकडे कुणी येत असेल, तर त्यांनी आमच्याकडे किंवा भाजपात येऊ नये असे मी जाहीर आवाहन करतो असे सांगत कुणीही दडपण आणि भीतीखाली पुण्याचे काम करू नका अशी टिका एकनाथ शिंदे यांनी केली.
संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवर बोलताना, संजय राऊत यांची ईडी चौकशी सुरु आहे. तेच म्हणाले, मी काही केले नाही. मग ज्यांना कर नाही त्यांना डर कशाला, चौकशी होऊ द्या त्यातून पुढे सत्य काय ते कळेलच, असे एकनाथ शिंदे म्हणाले.