मुंबई
sugarcane crisis in maharashta राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला असून राज्य सरकारने या अतिरिक्त उसाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच चार लाख मेट्रिक टन इतका ऊस शिल्लक आहे.
गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ऊस गाळपाला गेला नाही म्हणून आत्महत्या केल्यानंतर सरकारला जाग आली आणि आता हा सर्व उस गाळप करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
sugarcane crisis in maharashta या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली.
राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक असून यामध्ये सर्वाधिक ऊस हा बीड जिल्ह्यामध्ये शिल्लक आहे.
त्याखालोखाल जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, नंदूरबार, औरंगाबाद, परभणी, पुणे, नाशिक, जळगाव, हिंगोली, नागपूर,वर्धा, सोलापूर आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यामध्ये एकूण 19.52 लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे.
राज्यातील गळीत हंगाम हा 15 मेपर्यंत संपला. 126 राज्यातील कारखाने बंद झाले. 31 पर्यंत 36 कारखाने सुरू राहणार असून राज्यातील 1268.81 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.मे अखेर 19. 52 लाख मेट्रिक टन गाळप अपेक्षित आहे.
अधिक वाचा :चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना नेपाळचा लुंबिनी वर्ल्ड पीस सन्मान जाहीर
यंदा दरवर्षीच्या उसाच्या गाळप पेक्षा यंदा हे क्षेत्र 2.25 लाख हेक्टर उसाचे जास्तीचे उत्पादन झाले आहे. ऊस गाळपाचा हा हंगाम वाढल्याचे दिसत आहे.