बीड
राज्य शासनाने आज सेवा जेष्ठतेनुसार वर्ग दोनच्या पदावर कार्यरत असणारया अधिकार्यांना पदोन्नती दिली. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने आदेश काढला आहे. या आदेशानुसार बीड जिल्हा शिक्षणाधिकारी education-officer माध्यमिक पदी नागनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात नुकताच आदेश जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील ५२ अधिकार्यांना पदोन्नती देण्यात आली आहे .त्यानुसार नागनाथ शिंदे यांची महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षणाधिकरी बीड या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब ( प्रशासन शाखा ) मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने मान्य केलेल्या निवडसूचीनुसार शिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ (प्रशासन शाखा) या पदावर सुधारित वेतन संरचनेत ज्येष्ठतेनुसार व गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर खालील अटींच्या अधीन राहून तात्पुरती पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
नागनाथ शिंदे हे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे गटशिक्षणाधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी अंबाजोगाई, गेवराई येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पहिले आहे.
बीड जिल्ह्यात 1 ते 7 च्या शाळा सोमवारपासून सुरु
गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी पद हे रिक्त होते. या पदावर जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता विक्रम सारूक यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. आता माध्यमिक विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी उपलब्ध झाले आहेत.