बीड जिल्ह्यात 28 कोरोना बाधित सर्वाधिक आष्टीत
बीड दि 25 डिसेंबर,प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील कोरोना चा आकडा कमी जास्त होताना दिसत आहे. आज आलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 28 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या आष्टी तालुक्यातील आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या कमी अधिक होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून ही संख्या 100 च्या आत येत असून त्यामुळे हे एक चित्र बीड जिल्ह्यासाठी दिलासादायक असेच म्हणावे लागेल.
बीड आष्टी आणि अंबेजोगाई वगळता सर्व तालुक्यात ही संख्या नसल्यासारखी आहे.
जिल्ह्यातील 06 तालुक्यामध्ये ही संख्या 28 इतकी आहे. आज बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे अंबाजोगाई 02 आष्टी 12 ,बीड 10, केज 01 माजलगाव 02, वडवणी 01 एकूण 28 जणांचा समावेश आहे
बीड जिल्ह्यातील एकूण 796 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. अहवालामध्ये 767 अहवाल हे निगेटिव्ह आले आहे.आष्टी तालुक्यातील 12 बधितांमध्ये आष्टी 8,कारखेल 01,शेरी 02 आणि डोईठाण येथील एकाचा समावेश आहे
हेही वाचा:एड्स जनजागृती व HIV तपासणी कार्यक्रम वासनवाडी येथे संपन्न
Ja naprawdę doceniam twoją pracę, Świetny post test na koronowirusa test na koronowirusa.