मुंबई,प्रतिनिधी
Anil deshmukh,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज इडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने अखेर अटक केली. अनेक दिवसापासून इडी आणि अनिल देशमुख यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु होता.
यासंदर्भात इडी ने उशिरा अनिल देशमुख Anil deshmukhयांना अटक करण्यात आले असल्याचे सांगितले.
मनी लॉंडरिंग आणि 100 कोटी रुपयांच्या वसुली संदर्भात यापूर्वी इडी ने त्यांना समन्स बजावले होती.त्यानंतर ते काल मुंबईत सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशी साठी हजर झाले होते. दिवसभर त्यांची चौकशी सुरु होती.
Anil deshmukh,इडी ने केली बारा तास चौकशी
त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे सक्त वसुली संचालयाने जाहीर केले. अनिल देशमुख हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार असून महाआघाडी सरकार मध्ये गृहमंत्री होते. त्यांच्यावर झालेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
NEET Result 2021 चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा