ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर
मुंबई, दि. २९ :
obc scholarship,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारानेओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील दहावी नंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये शासनाने मंजूर केलेले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
obc scholarship,ओबीसी, व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील दहावी पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर झालेली हि रक्कम महाडीबिडी प्रणालीद्वारे वितरित केली जाणार आहे. यापूर्वी रुपये ४३६ कोटी रुपये रक्कम वितरित करण्यास सप्टेंबर मध्ये मान्यता दिली होती. ही रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आली असल्याची माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली आहे.
obc scholarship,मुळे विद्यार्थ्यांना दिलासा
आणखी वाचा :crop insurance,पीकविमा साठी किसान सभेची शिरसाळा ते बीड संघर्ष दिंडी!
राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या प्रवर्गातील मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाते.शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये मंजूर झाल्याने विद्यार्थी स्तरातून श्री. वडेट्टीवार यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.