Saptami 2021,शक्तिस्वरुप तृतीयपंथी आणि देवदासी महिलांचा मेहंदी काढून सन्मान
पुणे,प्रतिनिधी
Saptami 2021,साईनाथ मंडळ ट्रस्ट व मृगनयनी मेहंदी आर्ट यांच्यावतीने तृतीयपंथी पन्ना गाबरेल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
भारतीय संस्कृतीमध्ये नारीला शक्तीचे रूप मानले जाते. त्यामुळे नवरात्रीमध्ये नारीरूपी शक्तीची पूजा, उपासना केली जाते.
देवदासी महिला व तृतीयपंथी हे समाजातीलच विशेष घटक आहेत, त्यामुळे त्यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते.
Saptami 2021,तृतीयपंथी भगिनींचे औक्षण करून आणि त्यांच्या हातावर मेंदी काढून नवरात्रीनिमित्त त्यांचादेखील सन्मान करण्यात आला.
साईनाथ मंडळ ट्रस्ट व मृगनयनी मेहंदी आर्ट यांच्यावतीने बुधवार पेठेतील ढमढेरे गल्ली येथे ‘त्यांचाही सन्मान ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी आशीर्वाद संस्था व पन्ना गाबरेल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा विधी प्राधिकरण पुणेचे सदस्य सचिव प्रताप सावंत, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयुष शाह, मृगनयनी मेहंदी आर्टच्या धनश्री हेंद्रे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
प्रवीण वळवडेकर, सीनेत सदस्य भाग्यश्री मंथाळकर, प्रकाश यादव, सचिन हिंगणेकर, स्वप्नील दळवी, कुमार रेणुसे, प्रफुल पोतदार, वैशाली सिंघवी, किरण सोनिवाल, प्रकाश कुचेकर, पुनम क्षिरसागर, संजीवनी कदम ,प्रिती तांदळे उपस्थित होते.
Saptami 2021, जिल्हा विधी प्राधिकरण पुणे यांच्या वतीने प्रबोधन
प्रताप सावंत म्हणाले, सर्वांना न्यायाची समान संधी मिळावी यासाठी सरकार विविध कायदे आणि योजना राबवित आहेत.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचता यावे म्हणून सरकार न्यायालय आपल्या दारी ही संक्लपना राबवित आहे.
nitin gadkari:जामखेड सौताडा बीड रस्त्यासाठी 135 कोटी रुपयांची मंजुरी,गडकरी यांची घोषणा
पीयुष शाह म्हणाले, तृतीयपंथीयांनी बुधवार पेठेतील महिलांसाठी खूप मोठे काम केले आहे.
मागील दोन वर्षांच्या कोविडकाळात पन्ना गाबरेल यांनी बुधवार पेठेतील महिलांना भोजनाची व्यवस्था केली.
त्यांच्या या कार्यासाठी आज त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आणखी वाचा :RCB vs KKR,IPL 2021,सुनील नरेनने दाखवला आरसीबीला घरचा रस्ता