CSK vs RR IPL 2021:ऋतुराज गायकवाडचा धावांचा पाऊस,तरीही पराभव

- Advertisement -
- Advertisement -

 

अबू धाबी ( गौरव डेंगळे,३/१०)

CSK vs RR IPL 2021:शिवम दुबे व यशस्वी जयस्वाल यांच्या शानदार झंझावाती खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा ७ गडी राखून पराभव केला.

अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईने CSK प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून १८९ धावा केल्या.

सलामीवीर ऋतुराज गायकवाडने चेन्नईसाठी नाबाद १०१ धावा केल्या तसेच रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात मध्ये १५ चेंडूत नाबाद ३२ धावा चोपल्या. अवघड असे लक्ष्यही राजस्थानच्या फलंदाजांनी सोपे केले.

राजस्थानने RR तीन विकेट गमावून १७.३ षटकांत लक्ष्य गाठले. या विजयासह राजस्थानने प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे.

मोठ्या लक्ष्यासमोर राजस्थानला हवी ती सुरुवात मिळाली.यशस्वि जैस्वाल व एविन लुईस या जोडीने पॉवरप्लेमध्ये संघाला मजबूत धावसंख्या दिली.

CSK vs RR IPL 2021 सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ही भागीदारी तुटली.शार्दुल ठाकूरने लुईसचा २७ धावांचा डाव संपवला. दोन वर्षांनंतर चेन्नईसाठी पहिला सामना खेळणाऱ्या केएम आसिफने जयस्वालला महेंद्रसिंग धोनीकडे झेलबाद केले.

जयस्वालने २१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या.या नंतर सामन्याचे सूत्र दुबे आणि सॅमसन यांनी हाती घेतले.

सलग २ गडी बाद झाल्यानंतर चेन्नईचा संघ राजस्थानवर वर्चस्व गाजवेल असे वाटत होते, पण दुबे व सॅमसनने हे होऊ दिले नाही.

दुबेने उत्कृष्ट फॉर्म दाखवत लांब फटके मारले.त्याने आपल्या डावात चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले. राजस्थानच्या फलंदाजांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे, ते पाहून चेन्नई या सामन्यात आहे असे कधी वाटले नव्हते.

दुबेने आपले अर्धशतक ३१ चेंडूत पूर्ण केले. सॅमसन मात्र २८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने २४ चेंडूत २८ धावा केल्या व दुबेसोबत ८९ धावांची भागीदारी केली.

तत्पूर्वी, गायकवाड ruturaj gaikwad व जडेजाने चेन्नईला जोरदार लक्ष्य मिळून दिले.या जोडीने २२ चेंडूत ५५ धावांची खेळी खेळली, त्यापैकी ३८ धावा केवळ चौकारांमधून आल्या.राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

CSK vs RR IPL 2021 चेन्नईच्या गायकवाड CSK आणि डु प्लेसिस जोडीने संघाला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या.

डु प्लेसिस २५ धावा काढून बाद झाला.सुरेश रैना पुन्हा एकदा अपयशी ठरला व तो फक्त ३ धावा करुन बाद झाला. मोईन अलीने १७ चेंडूत २१ धावा केल्या.

पण दुसऱ्या टोकावर उभ्या असलेल्या गायकवाडने ruturaj gaikwad तुफानी फलंदाजी करत ६० चेंडूंत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या, ज्यामुळे संघाला मजबूत धावसंख्या मिळाली.

त्याला जडेजाची साथ मिळाली. गायकवाडने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आयपीएलचे पहिले शतक पूर्ण केले.

CSK vs RR IPL 2021,संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्स CSK: २० षटकात ४/१८९ ( ऋतुराज गायकवाड ruturaj gaikwad१०१, रवींद्र जडेजा ३२, राहूल तेवातीया ३/३९)

राजस्थान रॉयल्स RR: १७.३ षटकात ३/१९० (शिवम दुबे ६४*, यशस्वी जैस्वाल ५०, शार्दुल ठाकूर २/३०)

READ MORE:MI vs DC IPL 2021;दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पराभवानंतर प्ले ऑफसाठी मुंबई इंडियन्स देव भरोसे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles