women cricket 2021 ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला गुलाबी-चेंडू कसोटी तिसऱ्या दिवस अखेर यजमान ऑस्ट्रेलिया ४ बाद १४३ धावा

women cricket
women cricket matches played in austrelia

 

ऑस्ट्रेलिया (गौरव डेंगळे,३/१०)

in article

women cricket :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव गुलाबी चेंडू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय महिला क्रिकेट संघाने ३७७/८ वर घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने indian women cricket team दिवस अखेर ४ बाद १४३ धावा काढल्या.

तिसरा दिवस अखेर ऑस्ट्रेलियाचा संघ २५४ धावांनी पिछाडीवर आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने indian women cricket team ५ बाद २७६ आज तिसरा दिवसाचा खेळाची सुरुवात केली.

दिप्ती शर्माने उपयुक्तत ६६ धावांची खेळी केली. तानिया बतीया २२ धावा व पूजा वस्त्रकर १३ धावा यांनी शर्माला चांगली साथ दिली.

१४५ षटकात ८ बाद ३७७ वर भारतीय कर्णधार मिताली राजने  संघाचा पहिला डाव घोषित केला.

ऑस्ट्रेलिया महिला संघाकडून पेरी, कॅम्पबेल व मोलिन्युझ यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

ऑस्ट्रेलिया महिला संघाने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात केली. सलामी फलंदाज मूनीला भारताची प्रमुख गोलंदाज गोस्वामीने ४ धावावर बाद केले.

हिली चांगली फलंदाजी करत असताना एक सुरेख चेंडूवर तिला गोस्वामी ने २९ धावांवर बाद केले.३८ धावावर असताना कर्णधार लांनींगला वस्त्रकरने बाद केले.

चांगल्या फॉर्ममध्ये असणारी फलंदाज तहलिया वस्त्रकरने २८ धावावर बाद करुन सामन्यातील वैयक्तिक दुसरी विकेट घेतली.

पेरी नाबाद २७ व गार्डनर नाबाद १३ धावा करून दिवस अखेर पर्यंत ऑस्ट्रेलिया संघासाठी कुठलीही पडझड होऊन दिली नाही.

या कसोटी सामन्याचे आणखी दोन दिवस बाकी आहे,या सामन्यात भारतीय महिला संघाने indian women cricket team आपले वर्चस्व आजपर्यंत सिद्ध केले आहे.

READ MORE :CSK vs RR,IPL2021:ऋतुराज गायकवाडचा फलंदाजीने अबू धाबीत धावांचा पाऊस,तरीही चेन्नईचा पराभव

women cricket धावफलक:

भारतीय महिला क्रिकेट  : पहिला डाव १४५ षटकात ८/३७७ घोषीत (स्मृती मंधना smriti mandhana १२७, दिप्ती शर्मा ६६,मोलिन्युझ २/४५)

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट: पहिला डाव ६० षटकात ४/१४३ (लांनींग ३८, पेरी नाबाद २७, गोस्वामी २/२७)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here