अबू धाबी (गौरव डेंगळे,२/१०)
MI vs DC IPL 2021;१३० धावांचा पाठलाग करताना दिल्ली ३०-३ आणि ९६-६ अशा बिकट स्थितीतून अय्यरचा नाबाद ३३ धावा व अश्विनचा नाबाद २० धावाच्या जोरावर दिल्लीने मुंबईला ४ गडी राखून पराभूत केले.
तत्पूर्वी,प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाने MI सूर्यकुमार यादवचा सर्वाधिक ३३ धावाचा खेळीने २० षटकात ८ बाद १२९ धावा काढल्या.
दिल्ली संघाकडून DC अवेश खानने १५ धावा देऊन ३ गडी बाद केले तर अक्षर पटेलने २१ धावा देऊन ३ गडी बाद केले.
या पराभवने मुंबईच्या प्ले-ऑफच्या MI आशा देव भरोसे आहेत.दिल्लीला आधीच पहिल्या चारमध्ये स्थान होते,या विजयामुळे दिल्लीचा पहिल्या दोन स्थानामध्ये समावेश होईल.
MI vs DC IPL 2021 या सामन्यात आवेश आणि नॉर्टजे पुन्हा प्रभावित केले.शारजामध्ये खेळपट्ट्या संथ असल्यामुळे ५ सामन्यांत सरासरी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने फक्त १३४ धावा काढल्या आहेत.
२४ वर्षीय भारताचा वेगवान गोलंदाज अवेश आणि दक्षिण आफ्रिकेचा एनरिक नॉर्टजे या आयपीएलचे मुख्य तारे आहेत.
दोघांनीही वेगाने आणि अचूकतेने गोलंदाजी केली आहे व ते अत्यंत किफायतशीर आहेत.
त्यांनी ८ षटकांत फक्त ३४ धावा दिल्या. उल्लेखनीय म्हणजे टी ट्वेंटी मध्ये ३१ डॉट बॉल टाकले आहे.
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू किरॉन पोलार्डची महत्त्वाची विकेट मिळवताना नॉर्टजेने पुन्हा एकदा त्याच्या मधल्या षटकातील पराक्रम दाखवला, त्याला फक्त ६ धावांवर बाद केले.
अवेश, जो अजून भारतासाठी खेळला नाही, त्याने भारताचा सलामीवीर रोहित शर्माला पॉवरप्लेमध्ये ७ धावावर बाद केले.
आवेशने मग मागच्या सामन्यातील हिरो हार्दिक पांड्याला १७ धावांवर बाद केले. सौरभ तिवारीला १५ धावावर असताना अक्षर पटेल ने बाद केले. प्रमुख फलंदाजाच्या निराशाजनक कामगिरीमुळे मुंबई संघाला कमी धावसंख्यावर समाधान मानावे लागले.
MI vs DC IPL 2021;संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स MI : २० षटकात १२९/८ ( सूर्यकुमार यादव ३३, डी कॉक १९, आवेश खान ३/१५)
दिल्ली कॅपिटल DC : २० षटकात १३१/६ ( श्रेयस अय्यर ३३*, रिषभ पंत २६, कृणाल पांड्या १/१८)