Homeताज्या बातम्यानगर जिल्ह्यात दुकाने आता 10 वाजेपर्यंत चालू राहणार 

नगर जिल्ह्यात दुकाने आता 10 वाजेपर्यंत चालू राहणार 

 

 

 

नगर – प्रतिनिधी

राज्यातील  टाळेबंदी हळूहळू कमी होत असताना जिल्ह्यातील निर्बंध कायम होते मात्र आता हे निर्बंध उठविण्यात आले आहेत. आता दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

यापूर्वी जिल्ह्यातील दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु होती मात्र आता हे निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. १५ ऑगस्ट पासून हे दुकाने खुली होणार आहेत. यासंदर्भातील सविस्तर निर्णय जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला. यामध्ये मंदिरे आणि सिनेमागृहे यांना बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातील उपहारगृहे हे 50 टक्के च्या क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु असणार आहेत.

या व्यतिरिक्त जिम योग सेंटर, स्पा सुरु असणार आहेत. या सर्व अस्थापनामधील कर्मचार्यांचे लसींचे दोन मात्रा पूर्ण झाले असले पाहिजे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील व्यापार्यांना दिलासा मिळाला आहे.

 

आणखी वाचा :पाथर्डी शहरात वीज चोरी ला लावला इतका दंड ;आठ वीज चोर पकडले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments