कोरोनाबाधीत रूग्णांना धीर देण्यासाठी आ. सुरेश धस कोव्हीड सेंटरमध्ये
आष्टी(प्रतिनिधी)
तालुक्यातील कोरोनाबाधीतांचा अकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.मात्र, कोव्हीड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या काही कोरोना रूग्णांना रक्ताचे नातातील लोकं विचारण्यास येत नाहीत.आ. सुरेश धस हे स्वत:कोरोना रूग्णांशी विचारपूस करत डाॅक्टरांना उपचारासंबंधी सुचना देत असल्याने रूग्णांना आधार मिळत आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या वतीने सुरू असलेल्या “आईसाहेब” कोव्हीड सेंटरमधील रुग्णांना आज बुधवार दि.१९ रोजी आ.सुरेश धस यांनी भेट दिली.यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करत येथील डाॅक्टरांनी सविस्तर उपचाराबाबत चर्चा करून रूग्णांना दिलासा दिला.तालुक्यात काहि घटना आशा घडल्या आहेत की,कोरोनाबाधीत झाल्यावर एकदा उपचारासाठी रूग्णालयात रुग्णांदाखल केल्यावर विचारायला सुध्दा येत नाहीत.मात्र जनसेवेचा वसा अविरत चालवत संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक कोविड सेंटर मधील अडीअडचणी जाणून घेत अचानक भेटी देऊन आ.सुरेश धस स्वत:जातीने सर्व कोरोना रूग्णांवर लक्ष ठेऊन आहेत. याचबरोबर प्रत्येक रूग्णांना भेटुन तब्यतीची काळजी घ्या अशी विचारणा करत असल्याने कोरोना रूग्णांना मोठा आधार होत मिळत आहे.
आणखी वाचा:यूट्यूब चैनलवर आता कधीही जाहिरात सुरू होणार; काय आहे युट्युबची नवीन पॉलिसी