बीड जिल्ह्यात आगामी तीन दिवस कडक लॉक डाउन
बीड दि 4 मे प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात आगामी तीन दिवस कडक लॉक डाउन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जाहीर केले आहे.हे लॉक डाउन उद्यापासून तीन दिवस असणार आहे .
त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद असणार आहे.बँका ह्या सकाळी 10 ते 12 या वेळेत सुरू असणार आहेत.मात्र शनिवारी आणि रविवारी राज्य शासनाच्या लॉक डाउन च्या नियमाप्रमाणे सुरू राहतील असे त्यांनी जाहीर केले आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी हे आदेश काढले असून शनिवारी आणि रविवारी राज्य शासनाच्या नियमावली नुसार अत्यावश्यक सेवेसह भाजीपाला, मटण अंडे यांची दुकाने सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू राहतील.इतर सर्व व्यवहार बंद राहतील असेही त्यांनी कळविले आहे.
हेही वाचा:कोरोनाने माणुसकी हरवली;मुस्लिम युवकांनी जागविली