अहमदनगर – अकोले येथें दररोज 100 पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहे . अकोले शहरात फक्त तीन कोविड सेंटर आहेत एक सरकारी आणि दोन खाजगी राजूर येथे नव्याने कोविड सेंटर सुरू आहे . चार कोविड सेंटर अपुरे पडत आहे याचा विचार करून अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन , व्हा चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांनी अगस्ति देवस्थान ट्रस्ट चे अगस्ति मंदिरा लगत असलेले भक्तनिवासा मध्ये 150 बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. आमदार डॉ किरणजी लहामटे, अगस्ति चे व्हा चेअरमन सिताराम पाटील गायकर, तहसीलदार मुकेश कांबळे देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष के. डी. धुमाळ , संपत नाईकवाडी, संचालक बाबासाहेब ताजने, अशोकराव आरोटे, अशोकराव देशमुख, गुलाब शेवाळे, महेश नवले, मच्छिन्द्र धुमाळ, परबत नाईकवाडी, कचरू पाटील शेटे, डॉ शेटे ,रवींद्र मालूनजकर, भानुदास तिकांडे , यांच्या प्रमुख उपस्थिती आज या कोविड सेंटर चे उद्घाटन करण्यात आले.