भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण:रूपाली चाकणकर यांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

पुणे,

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे पाठवला आहे या संदर्भात त्यांनी आपल्या यक्स अकाउंट वरून आपण राजीनामा देत असल्याचे कळवले आहे

nashik bhondu baba ashok kharat sit enquiry कथित भोंदू बाबा अशोक खरात याची एसआयटी चौकशी सुरू

.
आपल्या एक्स पोस्ट वर त्यांनी म्हटले की,
खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते वेदनादायक आहे.सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.

हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मा.मुख्यमंत्री,
मा.उपमुख्यमंत्री,मा.पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.

आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles