Dhurandhar the revenge connection to ahilyanagar ‘धुरंधर द रिवेंज’चा आणि अहिल्यानगरचा काय संबंध ?

मनोज सातपुते

“हिंदुस्थानी काफ़िर का सर काट कर मुशर्रफ़ के दस्तर खाने पे रखा था मेजर इक्बालने I”

Dhurandhar the revenge connection to ahilyanagar  धुरंधर द रिवेंज  मधील अर्जुन रामपालच्या तोंडी असलेले वाक्य, म्हणजेच मेजर इक़्बाल ने हमजा म्हणजेच रणबीर सिंग यांना उद्देशून काढलेला डायलॉग आदित्य धर यांनी निर्माण केलेल्या धुरंदर या चित्रपटाच्या सिक्वल म्हणजेच धुरंदर द रिव्हेंज होय. सध्या हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजतोय, किंबहुना त्याने सर्वाधिक बॉक्स ऑफिस वर कमाई करत आहे.

आदित्य धर यांचा धुरंधर हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर अमाप प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी आपल्या दुसरा चित्रपट आणला. वास्तविक पाहता पहिल्या चित्रपटातील कहाणी आणि नवीन चित्रपटातील कहाणी याचा संबंध लागत नाही तरी त्यांनी कसे तरी करून तो जुळविण्याचा प्रयत्न केला आहे.

धुरंधर 2 मधील  रणबीर सिंग याचे पात्र थोडे अतिशयोक्ती वाटते. यातील खलनायकांची जंत्री मधील मेजर इक्बाल हा प्रेक्षकांना चांगलाच भावतो. पहिल्या धुरंधर मधील अक्षय खन्ना करत असलेली भूमिका म्हणजेच रहेमान डकैत आणि धुरंधर 2 मधील मेजर इक्बाल यांच्या व्यक्तिरेखा चांगल्या फुलल्या आहेत. चित्रपटात सर्व काही काल्पनिक असल्याचे सांगत असले तरी त्याचा संबंध खऱ्या घटनेशी आलेला दिसतो.

 या चित्रपटातील काही कथानक हे हिंदुस्थानच्या सत्य घटनेतील असल्याचे या चित्रपटातील वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या डायलॉग मधून दिसते. मेजर इकबाल म्हणजेच तत्कालीन हूजी या आतंकवादी संघटनेचा कमांडेंट. त्याचे मूळ नाव इलियास कश्मीरी.  पाकिस्तानी लष्करातील एक अधिकारी नंतर तो या जिहादी मध्ये सामील झाला. तो हुजी चा कमांडट बनला. याच इलियास काश्मिरी ने भारताच्या लाईन ऑफ कंट्रोल जवळच्या नौशेरा क्षेत्रात भारतीय सैनिकांवर हल्ला चढविला.यामधे 7 सैनिक मारले गेले.

 २७ फेब्रुवारी 2000. जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा क्षेत्रात, ‘नियंत्रण रेषे’च्या (Line of Control)  जवळ त्या रात्री जी घटना घडली,ती घटना भारतीय कधीच विसरू शकत नाहीत. तसेच भारतीय लष्कराच्या  इतिहासात कायम स्मरणात राहील. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोळगाव येथील हवालदार भाऊसाहेब मारुती तळेकर आणि त्यांचे सहकारी जम्मू काश्मीर भागातील एका चौकीवर गस्त घालत होते. अजोड धैर्य, शिस्त आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेसह त्यांचा चमू पहारा देत होते. संख्येने कमी असूनही, मनोबलाच्या बाबतीत कधीही कोणापेक्षा उणे न ठरलेल्या या शूर सैनिकांनी आपली जागा खंबीरपणे राखली आणि राष्ट्राप्रती असलेल्या समर्पणाचा खरा अर्थ सिद्ध करून दाखवला.

Dhurandhar the revenge connection to ahilyanagar ‘धुरंधर द रिवेंज’चा आणि अहिल्यानगरचा काय संबंध ?

  त्या रात्री हिंदुस्थानी सैनिकांवर याच मेजर इक्बाल म्हणजेच इलियास काश्मिरी ने हल्ला चढविला. यामध्ये सात जवान शहीद झाले. यातील एक असलेले अगदी तारुण्यातील युवक जो देशसेवा करण्यासाठी सैन्यात दाखल झाला होता. बेळगाव मधून मराठा लाईट इन्फंट्री चा जवान यामध्ये शहीद झाला.भाऊसाहेब याला मारल्यानंतर याच इलियास काश्मिरीने आपल्या हातात त्याचे मुंडके घेतले आणि फुटबाल सारखे लाथाडत त्याची विटंबना केली. इलियास काश्मिरी हा अतिशय क्रूर असा जिहादी, तो मुंडके कापून थांबला नाही तर त्याने ते भाऊसाहेब याचे मुंडके हातात धरून थेट परवेझ मुर्शरफ समोर नेले आणि भेट दिले. त्याच्या या कृत्याचे फोटो पाकिस्तानी आणि जिहादी मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे तो आणखीच प्रसिद्ध झाला. परवेझ मुशर्रफ यांनी त्याला 1 लाख पाकिस्तानी रुपये बक्षीस म्हणून दिले.

शहीद जवान भाऊसाहेब तळेकर याचे पार्थिव शरीर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याच्या गावी म्हणजेच श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे आणण्यात आले. तेव्हा भाऊसाहेब याचा चेहरा उघडण्याचे कुटुंबीयांनी सांगताच लष्करी अधिकारी यांनी पार्थिव शरीर न उघडण्याचे आदेश असल्याचे सांगितले. त्या कुटुंबियांना भाऊसाहेब याचा चेहराही पाहता आला नाही. त्याचे मुंडके पाकिस्तानने भारताला कधीही परत केले नाही.

प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटावे असे भाऊसाहेब तळेकर याची गौरवगाथा आहे. ज्याने देशासाठी आपले बलिदान तर दिलेच पण आपले मुंडके कायम स्वरूपी पाकिस्तानात ठेवले.

हाच तो मेजर इक्बाल ज्याने भाऊसाहेब याची हत्या केली.त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्त्ताने भाऊसाहेब तळेकर याच्या बलिदानाची आठवण यावी आणि त्याला कायम आठवणीत ठेवावे हा यामागील प्रयत्न.

 त्यानंतर हा हुजीचा इलियास काश्मिरी जेव्हा मारला गेला तेंव्हा या गावात उत्सव साजरा करण्यात आला. अमेरिकेने ड्रोनद्वारे इलियास काश्मिरी यांचे शीर उडवले.

अहिल्यानगर जिल्ह्यातलं कोळगाव,जिथे १९१४ ते १९१९ दरम्यान झालेल्या महायुद्धात सहभागी झालेल्या ५० जणांच्या स्मरणार्थ थेट प्रवेशद्वारावरच फलक लावण्यात आले आहेत.

आता, गावात शहीद सैनिक भाऊसाहेब तळेकर आणि सचिंद्र साके यांना समर्पित एक स्मारक उभारण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles