नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर एसआयटी कडून त्याची चौकशी सुरू आहे.
नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर आता तपास अधिक वेगाने पुढे जात असून, विशेष तपास पथक (SIT) त्याची कसून चौकशी करत आहे.
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी खरात याला एसआयटी चौकशीसाठी हिमांशू पोलीस क्लब, नाशिक येथे आणण्यात आले. मात्र, प्रसारमाध्यमांची मोठी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी त्याला मुख्य प्रवेशद्वाराऐवजी मागील दरवाजातून गुपचूप आत नेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कारवाईबाबत अधिकच चर्चांना उधाण आले आहे.
ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी 12 अधिकाऱ्यांची विशेष एसआयटी टीम स्थापन करण्यात आली असून, ही टीम विविध अंगांनी तपास करत आहे. पीडित महिलांचे जबाब, आर्थिक व्यवहार, तसेच आरोपीचे राजकीय आणि सामाजिक संबंध यांचा सखोल छडा लावला जात आहे.
अशोक खरात हा स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि दैवी शक्तींचा जाणकार म्हणून सादर करत होता. त्याच्या या प्रतिमेचा फायदा घेत अनेक महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. सध्या एसआयटीकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

