नाशिकचा बाळू बोडकेची उपांत्य फेरीत मजल
pune,
68th maharashtra kesari kusti महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे सिकंदर शेख,शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, हर्षवर्धन सदगीर यांनी विजयी सलामी दिली. स्पर्धेत नाशिकच्या बाळू बोडकेने धडाकेबाज कुस्तीचे प्रदर्शन घडवित माती विभागात उपांत्य फेरीत मजल मारली आहे.
वाघोलीतील रामकृष्ण सातव पाटील आयोजित महाराष्ट्र केसरीच्या मैदानात नाशिकचा बाळू बोडके डार्क हाॅर्स ठरला आहे. सलामीच्या लढतीत कोल्हापूरच्या बलाढ्य माऊली जमदाडेवर बाळू बोडकेने 10 -5 गुणानी सनसनाटी विजय नोंदविला. पाठोपाठ दुसर्या फेरीत जळगावच्या हितेश पाटीलचा 10-0 गुणांनी पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली आहे ..
डबल महाराष्ट्र केसरी किताबासाठी शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर हे मल्ल सज्ज झाले आहेत.
महाराष्ट्र केसरी निकाल
पहिली फेरी
माती विभाग
महेंद्र गायकवाड, सोलापूर विजयी विरूध्द विशाल बनकर, सोलापूर 6-1
माऊली जमदाडे, सोलापूर पराभूत बाळू बोडके, नाशिक 5-10
सिकंदर शेख, सोलापूर विजयी विरुद्ध अनिकेत मांगडे, पुणे जिल्हा 8-1
गादी विभाग
शिवराज राक्षे, पुणे वि प्रतिक जगताप पुणे शहर
10 -0
पृथ्वीराज मोहोळ, पुणे विरूध्द अरूण चलावडे, जालना 10-0
हर्षवर्धन सदगीर, नाशिक विजयी विरुद्ध प्रतिक देशमुख, बीड 10-0

