अमोलक जैन संस्थेच्या शतकपूर्ती वर्षात न्यायमूर्तींची प्रेरणादायी उपस्थिती

राजेंद्र जैन/ कडा

कडा येथील अमोलक जैन शिक्षण संस्थाच्या शतकपूर्ती महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी न्यायक्षेत्रातील मान्यवरांनी दिलेली सदिच्छा भेट हा सुवर्णक्षण ठरला.

बीडचे जिल्हा सत्र न्यायाधीश आनंदजी यावलकर, न्यायाधीश व्यंकटेश पाटवणकर तसेच बारामती येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) प्रितेश भंडारी यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर प्रेरणेने उजळून निघाला.


कडा येथील अमोलक जैन शिक्षण संस्थेला मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन दिगंबर जैन मंदिरात जाऊन दर्शन घेत आत्मिक समाधान अनुभवले. मोतीलाल कोठारी विद्यालयच्या एनसीसी पथकाने बँडच्या तालावर दिमाखदार पथसंचलन करत स्वागत केले, तर विद्यार्थिनींनी नवकार मंत्र व स्वागतगीत सादर करून वातावरण भक्तिमय केले.

संस्थापक अमोलक ऋषीजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना कृतज्ञतेची भावना दाटून आली.


कार्यक्रमास ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. रतिलाल भंडारी, संस्थेचे अध्यक्ष योगेश भंडारी, सचिव हेमंत पोखरणा, कांतीलाल चानोदिया, संतोष गांधी, डॉ. उमेश गांधी, महेंद्र पटवा, बिपिन भंडारी, संजय मेहर, अनिल मुथा, बाबूलाल भंडारी,

ज्येष्ठ विधीज्ञ वाल्मीक तात्या निकाळजे, बाबुराव अनारसे, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रतिलाल कटरीया, जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सागर ढोले, सुभाष धुमाळ, संतोष औटी, महेंद्र पेटकर, सुमित शेटे, पत्रकार राजेंद्र जैन, प्रशांत धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.


न्यायमूर्ती यावलकर यांनी अमोलक ऋषीजींच्या दूरदृष्टीचे कौतुक करत, ग्रामीण व वंचित घटकांसाठी केलेले कार्य सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ असल्याचे भावपूर्ण शब्दांत सांगितले.

हा सोहळा म्हणजे ज्ञानसेवेच्या अखंड प्रवासाचा प्रेरणादायी उत्सव ठरला असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव हेमंत पोखरणा यांनी केले, सूत्रसंचालन प्राचार्य जवाहरलाल भंडारी यांनी तर आभार प्रशासकीय अधिकारी प्रा. नवनाथ पडोळे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles