अहिल्यानगर एटीएस छापा:यवतमाळ,अहिल्यानगरमध्ये एटीएसची एकाचवेळी मोठी कारवाई;

मुंबई:

अहिल्यानगर एटीएस छापा : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी एकाचवेळी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली. दहशतवादी कारवायांशी संबंधित गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून चौकशीसाठी अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिमध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही जिल्ह्यांतील २० हून अधिक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान एक डझनहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील काही तरुणांच्या कट्टरतावादासंदर्भातील विशिष्ट माहितीच्या आधारे, एटीएसने जिल्हा पोलिसांच्या मदतीने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेड शहरांमध्ये शोधमोहीम सुरू केली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

संशयितांशी संबंधित घरे, कार्यालये व इतर ठिकाणांसह एकूण १४ ठिकाणी झडती घेण्यात आली. या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

शोधमोहीमेदरम्यान काही गुन्हेगारी स्वरूपाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सध्या संशयितांची सखोल चौकशी सुरू असून अद्याप कोणालाही औपचारिक अटक करण्यात आलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या कारवाईसाठी मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सात ठिकाणीही अशाच स्वरूपाचे छापे टाकण्यात आले. येथेही संशयितांकडून काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले असून चौकशी सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई अद्यापही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles