प्रबुद्ध विचारक प. पू. श्री. आदर्शऋषीजी म. सा. यांच्यासह जैन साधू साध्वी यांचे भव्य रॅलीने आगमन

कडा

येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळामध्ये जैन धर्माचे राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांचे शिष्य प्रबुद्ध विचारक परमपूज्य श्री आदर्श ऋषीजी महाराज यांच्यासह जैन साधू अणि साध्वी यांची शोभा यात्रा काढण्यात आली.
कडा येथील जैन धर्मस्थानकापासून या यात्रेस प्रारंभ झाला.

Live कार्यक्रम link

प. पू. आदर्श ऋषीजी म. सा. यांच्यासह प. पू. उपप्रवर्तक अक्षय ऋषीजी महाराज, प. पू. अमृत ऋषीजी म. सा. प. पू. गीतार्थ ऋषीजी म. सा. तसेच महासतीजी उदय प्रभाजी महाराज आदी ठाणा, महासतीजी विपुल दर्शनाजी म. सा. आदी ठाणा हे यावेळी उपस्थित होते.त्यांच्या सोबत कडा श्रावक संघाचे पदाधिकारी तसेच अमूलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जैन स्थानकापासून या शोभा यात्रेत मोतीलाल कोठारी विद्यालयातील एनसीसी पथक स्काऊट गाईड पथक अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे फार्मसी कॉलेज डी फार्मसी कॉलेज गांधी महाविद्यालय पीएम मनोज ज्युनिअर कॉलेज अमोलक युनिव्हर्सल स्कूल चंदनमल भळगट प्राथमिक शाळा आदी विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

यामधे विविध वेशभूषेमध्ये मोतीलाल कोठारी विद्यालयातील विद्यार्थी तसेच संस्थेच्या सर्व विभागातील विद्यार्थी सहभागी झाले.

जैन स्थानकापासून तर अमोल जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयापर्यंत दुतर्फा विद्यार्थ्यांनी रांगा केल्या होत्या. महावीर स्वामी की जय जय आनंद अशा घोषणा देत माजी विद्यार्थ्यांसह बाहेर जाऊन आलेल्या जैन धर्मियांनी या महाराजांच्या रॅलीमध्ये सहभाग घेतला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles