बीड
न्या. आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधीसेवा प्राधिकरण बीडच्या वतीने मध्ये अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जनजागृती शिबीराचे आयोजन दिनांक 26/06/2025 रोजी सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय, बीड येथे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड सचिव श्रीमती. रेणुका एम. सातव, प्राचार्य डाॅ. महेंद्र गोशाल, डाॅ.मुजाहिद ईस्माइल मनोरागतज्ञ जिल्हा शासकीय रूग्णालय बीड, अधिकारमित्र तत्वशिल कांबळे, अशोक तांगडे अध्यक्ष बालकल्याण समिती बीड, मिथुन जोगदंड, शामसुंदर शिंदे अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड, ओंकार नाईकवाडे, रोहन दिवे हे उपस्थित होते.
या शिबीरात महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आदी हे बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाॅ. महेंद्र गोशाल यांनी केले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड सचिव श्रीमती. सातव मॅडम म्हणाल्या यांनी अंमली पदार्थ विरोधी जागरूकता आणि नशामुक्ती दिशादर्शक अंमली पदार्थ भारत योजना 2025 (DAWN), समितीची स्थापना व स्किम विषयी मार्गदर्शन केले, यासह शासकीय कार्यलयातील महिला वरील लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा (POSH ACT 2013) याबाबत मार्गदर्शन केले महिलांचे हक्क व अधिकार याविशयी मार्गदर्शन केले.
डाॅ.मुजाहिद मोहम्मद यांनी व्यसनाचे दुष्परिणाम सांगितले व ते व्यसन कमी कसे करावे व उडवावे यावर मार्गदर्शन केले.
अशोक तांगडे हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सायबर गुन्हयांचे प्रकारे विद्यार्थ्यांना समजावुन सांगितले, सायबर गुन्ह कसे घडतात ते सांगितले, त्यावर उपाय काय करावे यावर मार्गदर्शन केले.
तत्वशिल कांबळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बालक नशेच्या आहारी जात आहेत त्यामूळे प्रत्येक पालकाने आपला बालक काय करतो त्यांचे मित्र कोण आहेत याबाबत सजग राहणे गरजेचे आहे. किशोर वयीन बालकांसोबत मित्र बनुन रहावे व त्यांना सतत व्यसनाचे दुष्परिणाम काय आहेत याविषयी मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.
रोहन दिवे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड या कार्यालयाचे कामकाज कसे केले जाते यासह सामान्य लोकासांठी न्यायालयाच्या योजना याविशयी मार्गदर्शन केले.
ओंकार नाईकवाडे यांनी नालसा हेल्पलाईन नंबर 15100 या विशयी मार्गदर्शन केले यासह युवकांनी आपल्या सभोवती जर काही घडत असेल तर त्यांची माहिती आपण कार्यालयाशी देउन अन्याय थांबवु शकतो असे सांगितले.

