Homeताज्या बातम्याएसटी बस दुचाकीच्या धडकेत दुचाकीचा स्फोट

एसटी बस दुचाकीच्या धडकेत दुचाकीचा स्फोट

अहिल्यानगर
अहिल्यानगर कडे निघालेल्या एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचा स्फोट होऊन दुचाकीला आग लागली आणि या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना जामखेड नगर रस्त्यावर आठवड येथील हिंदुस्तान पेट्रोलियम च्या पेट्रोल पंपा जवळ घडली.

कडा कडून आलेली धारूर भिवंडी ही बस भरधाव वेगाने अहिल्यानगर कडे जात होती. नांदूर चा घाट उतरून एसटी पुढे आल्यानंतर समोरून आलेल्या दुचाकीस्वार आणि एसटी यामध्ये जोरदार धडक झाली.


या धडकेनंतर दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाला. या दुचाकी ने पेट घेतला. या दुचाकीवरून चाललेला व्यक्ती गाडीवरून उडून पडल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला.


या घटनेमध्ये दुचाकीचा कोळसा झाला. मृताची ओळख पटली असून हा जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते.
अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments