आष्टी तालुक्यात कोरोना @98, सर्वाधिक कुठले?
आष्टी दि 6 एप्रिल
आष्टी तालुक्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.आज आलेल्या 98 मध्ये सर्वाधिक रुग्ण गेल्या दोन दिवसांमध्ये जामगाव येथे आढळून आले आहेत.
आष्टी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून व्यापारी आणि नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. या अँटिजेंन टेस्टमध्ये अनेक व्यापारी आणि नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या आष्टी तालुक्यात झपाट्याने वाढली आहे.आज आलेल्या अहवालामध्ये तब्बल 98 कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये जामगाव येथील रुग्णांची संख्या पंचवीस इतकी आहे.कालही येथे 22 रुग्ण निघाले होते.
आष्टी तालुक्यातील आष्टी,कडा,धानोरा, धामणगाव या परिसरातील नागरिक आणि व्यापारी कोरोना बाधित होत असल्याचे दिसत आहे. यामध्ये आरोग्य विभाग,शाळा, स्टेट बँक ऑफ इंडिया, यातील कर्मचारी आणि व्यापारी यांचा समावेश आहे. आष्टी तालुक्यात कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासन आरोग्य आरोग्य विभागाच्या मदतीने काम करत आहे. त्यामुळे अधिकाधिक सुप्त असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या अँटिजेंन च्या माध्यमातून च्या माध्यमातून समोर येत आहेत. ग्रामीण भागातही कोरोना पेशंट आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
गावांच्या नावासाठी फोटो image पहा.