कोरोना संख्येत आष्टीने सर्व तालुक्याला मागे सारले@59
बीड दि 14 मे प्रतिनिधी
बीड जिल्ह्यामध्ये संख्या कमी होताना दिसत असताना आता पुन्हा संख्या वाढू लागली आहे.आष्टी तालुक्यात 59 बाधित आढळून आले आहेत.
गेल्या 8 दिवसापासून कोरोना संख्या कमी होत असताना काही तालुक्यात संख्या वाढत आहे.बीड जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या आटोक्यात आली आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातील टाळेबंदी शिथिल करण्यात आली.जिल्ह्याच्या पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला.मात्र पुन्हा कोरोना बाधित डोके वर काढत आहे.
आणखी वाचा:सांदण दरीत जाण्यास वनविभागाची बंदी
आज जिल्ह्यात 154 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामध्ये सर्वाधिक आष्टी तालुक्यातील संख्या सर्वाधिक आहे.
अंबेजोगाई येथे 09,आष्टी येथे 59, बीड येथे 14 धारूर, येथे 05, येथे गेवराई 11 येथे केज 22, माजलगाव येथे 04, परळी येथे 01, पाटोदा येथे 02, शिरूर कासार येथे 20 आणि वडवणी 07 येथे रुग्णांची नोंद झाली.
कोरोना साखळी कमी करायची असेल तर घरी राहून सुरक्षित राहणे गरजेचे आहे.