बीड-प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही .कालच्या तुलनेत आज संख्या वाढली असून 56 बाधित आढळून आले आहेत.
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी अधिक होत आहे यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली असताना आज बीड जिल्ह्यात 154 बाधित आढळून आले आहेत.
बीड जिल्ह्यातील बीड आणि आष्टी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी अधिक होत आहे.
आणखी वाचा :कुस्तीपटू विनेश फोगाट का केली सस्पेंड
आष्टी तालुक्यामध्ये 56 रुग्णांची नोंद झाली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये 154 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली त्यामध्ये आंबेजोगाई 2 आष्टी तालुका 56 बीड तालुका 17 ,धारूर तालुका 08, गेवराई तालुका 12, केज तालुका 11, माजलगाव तालुका 07,परळी 00,पाटोदा तालुका 16 ,शिरूर तालुका 16 आणि वडवणी तालुक्यात 9 रुग्णांची नोंद झाली.
आष्टी तालुक्यात सर्वच गावे कमी अधिक प्रमाणात बाधित आहेत.त्यामध्ये कडा, धानोरा, आष्टी ,धामणगाव, डोंगरगण, यांचा समावेश आहे.