32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या हस्ते उदघाटन

- Advertisement -
- Advertisement -

32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या हस्ते उदघाटन

बीड दि २० जानेवारी,प्रतिनिधी

32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या हस्ते जिल्हा वाहतुक शाखा, पोलीस चौकी येथे झाले.हे सुरक्षा अभियान दिनांक 18 जानेवारी  ते 17 फेब्रुवारी  या कालावधीत जिल्हाभरात जिल्हा वाहतुक शाखेकडुन राबविले जाणार आहे.

अभियानाचे औपचारिक उदघाटन जिल्हा वाहतुक शाखा, पोलीस चौकी पोलीस अधीक्षक आर. राजा, पोलीस यांचे हस्ते झाले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण सदस्य एस. एन. गोडबोले, विभाग नियंत्रक, एस. टी.महामंडळ जगनोर, एम.टी. ओ, प्रविण भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत झाले.

या  उदघाटन कार्यक्रमामध्ये एस.टी.महामंडळ, बीड येथील बस चालक, बीड शहरातील परवानाधारक अॅटो रिक्षा चालक, प्रशिक्षणार्थी वाहन चालक तसेच एन. सी.सी. कॅडेट, महामार्ग पोलीस मदत केंद्र गढी, मांजरसुंबा येथिल अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदविला.

उदघाटन कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश, महत्व सांगुन “सडक सुरक्षा-जीवन सुरक्षा” या अनुषंगाने चारचाकी वाहन चालवितांना सीटबेल्टचा वापर करणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालवु न देणे, वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर न करणे, हेल्मेट वापराचे महत्व, अतिवेगाने वाहन न चालविणे इत्यादीबाबत मार्गदर्शन करुन कायदेशिर तरतुदींबाबत माहिती देण्यात आली.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पुढील एक महिन्यात बॅनर्स लावणे, वाहन चालकांना लायसन्स, वाहतुकीबाबत
प्रबोधन करणे, वाहनांवरती रिफ्लेक्टर लावणे, विशेष मोहिम आखुन परिणामकारक केसेस करणे दुरध्वनी क्रमांकाचे बोर्ड लावणे, मोटार अपघात दाव्यांची माहिती देणे, शालेय विदयार्थ्यांचे प्रबोधन करणे, अपघातांतील जखमींचा जीव वाचविणे व त्यांचेवर तातडीने उपचार करणे इत्यादी उपक्रम जिल्हा वाहतुक शाखेकडुन कोविड-19 साथ रोगाच्या निर्देशाचे पालन करुन राबविण्यात येणार आहेत.
हा कार्यक्रम मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी आणि  अंमलदार यांनी पार पाडला.

हेही वाचा:शिरापूर येथील कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल आला

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles