कड्याच्या अँटिजेंन चाचण्यात 14 निघाले पॉझिटिव्ह
कडा दि 30 मार्च , प्रतिनिधी
जिल्ह्यात टाळेबंदी लागल्यानंतर जिल्ह्यातील सर्व व्यापारी ,कर्मचारी आणि बँक कर्मचारी यांना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आले असून नागरिक पुढे येऊन टेस्ट करून घेत आहेत.कडा येथील अँटिजेंन चाचण्यामध्ये 14 जण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ अनिल आरबे यांनी दिली.
बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत संपुर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे.दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतेय.नागरिकांमध्ये छुपा कोरोना असल्याचे या चाचण्या मधून उघड होत आहेत. नागरिकांमध्ये कोरोना नसल्याचे समजले जाते मात्र प्रत्यक्षात चाचणी केल्यानंतर बाहेर येत आहे. कोरोना ला समूळ नष्ट करण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन चाचण्या करून घेणे गरजेचे असल्याचे डॉ आरबे यांनी सांगितले.
दिवसभरात 249 नागरीकांच्या अँटिजेंन चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये 14 पॉझिटिव्ह आढळून आले.यामध्ये दोन आरोग्य कर्मचारी,एक शिक्षक यांचा समावेश आहे.
कडा ग्रामपंचायतच्या वतीने व्यापारी नागरिकांनी पुढे येऊन टेस्ट करण्याचे आवाहन सरपंच अनिल त्यात्या ढोबळे यांनी केले आहे.
[…] आणखी वाचा: कड्याच्या अँटिजेंन चाचण्यात 14 निघाले… […]