नगर जिल्ह्यात 86 रूग्णांना डिस्चार्ज;131 नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर
अहमदनगर दि १८ जानेवारी, प्रतिनिधी
जिल्ह्यात आज 86 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ९४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 131 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९४३ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४० आणि अँटीजेन चाचणीत ३३ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६, कर्जत ०५, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०२, पारनेर ०१, पाथर्डी ०६, राहता ०३, संगमनेर ०६, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०३ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.(131)
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ०१, जामखेड ०१, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०१, पारनेर ०१, राहाता ०४, संगमनेर ०१, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०२, जामखेड ०५, कर्जत ०४, नगर ग्रामीण ०४,नेवासा ०३, पारनेर ०१, पाथर्डी ०४, राहता ०१, राहुरी ०२, शेवगाव ०६ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.(131)
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ०६, जामखेड १०, कोपरगाव २१, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०७, पारनेर ०२, पाथर्डी ०५, राहाता ०४, राहुरी ०३, संगमनेर ०७, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:६८९४१*
*उपचार सुरू असलेले रूग्ण: ९४३*
*मृत्यू:१०८०*
*एकूण रूग्ण संख्या:७०९६४*(131)
हेही वाचा :शिरापूर पाठोपाठ सराटे वडगाव मध्ये कोंबड्या मृत