प्रवरानगर
केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शहा यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना येथे आयोजित परिषदेला संबोधित केले. आगामी काळात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नीती तयार् केली जाणार असून त्याद्वारे सहकार चळवळीला पुढे नेण्याचे काम केले जाणार आहे. प्रवरानगर लोणी हे क्षेत्र सहकाराचे काशी असल्याचे संबोधून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने या चळवळीला पुढे नेण्याचे काम केले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय सहकारिता मंत्री तथा गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर लोणी येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना येथे आयोजित सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड,माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,खासदार डॉ सुजय विखे, राज्य सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य sahkarita सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शाह यांच्या हस्ते पद्मश्री प्राप्त पोपटराव पवार,पद्मश्री राहीबाई पोपरे यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार २०१९ आणि २०२० प्राप्त डॉ रमेश धोंगडे आणि डॉ तारा भवाळकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अहमदनगर बीड परळी रेल्वे चा मुहूर्त ठरला!
हि भूमी सहकारी क्षेत्रासाठी काशी आहे,सहकाराची sahakarita आधारशीला तयार करण्याचे काम पद्मश्री विखे यांनी केले. धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव विखे आणि वैकुंठभाई मेहता यांनी सहकार आंदोलनांना गती देण्याचे काम केले. या भूमीचे माती ला नमन करायला हवे. असे सांगून गुजरात मध्ये पण सहकाराचे मॉडेल बनले आहे. असे ते म्हणाले.
जे सरकार ७५ वर्षापासून करू शकले नाही ते पंतप्रधान मोदी यांनी अमृत महोत्सव निमित्ताने सहकारिता मंत्रालय तयार केले आहे.सहकार आजही प्रासंगिक आहे त्यातून सबका साथ सबका विकास होऊ शकतो. हे त्यांनी जाणले आणि त्यातून हे मंत्रालय उभे राहिले.
दोषातून सहकार आंदोलन ला मुक्त करण्याची गरजा आहे.प्रत्येक जिल्ह्यात आदर्श बँका होत्या.या मध्ये १००० करोड के घपले कसे झाले.असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सरकार आपल्यास सोबत आहे. कोणी अन्याय नाही करू शकत , मात्र त्यामध्ये पारदर्शकता आणायला पाहिजे, व्यावसायिकता आणून स्पर्धेप्रमाणे युवकांना रोजगार दिला पाहिजे, उचित स्थान द्यावे लागेल.तरच हे सहकाराचे आंदोलन ५० साल आणि १०० वर्षे पुढे जाईल.
मोदी सरकारच्या माध्यमातून जी मदत पाहिजे ते द्यायला तयार आहोत. आंदोलन पुढे जाताना ते पाहायचे आहे. असे सांगून त्यांनी विखे यांनी जो साखर कारखाना सुरु केला .त्याबद्दल मला आनंद आहे. पण बरेच खाजगी झाले. हा कारखाना प्रेरणास्रोत आहे असेही ते म्हणाले.
प्रवरानगर लोणी हे क्षेत्र सहकारिता काशी
१९२३ मध्ये सहकारी क्रेडीट सोसायटी बनली, प्रवरा क्षेत्र सहकार मध्ये जोडलेल्या आणि सहकार co operative department क्षेत्रासाठी काशी आहे. प्रवरा साखर करण्याचे कौतुक केले.
सहकारिता मंत्रालयाची co operation स्थापन झाल्यानंतर काय साखर ३१% उत्पादन, दुधाचे २० % उत्पादन, १३% गहू, २०% धान, २५ %खाद,हे सहकारमधून निर्माण, वितरण करण्याचे काम केले जाते.
सहकाराचे मूलमंत्र म्हणजे आर्थिक क्षमता कमी आहे पण सहकाराच्या माध्यमातून कोणाच्या पुढे आम्ही जाऊ शकतो हा होय.
सहकारिता खाते तयार केल्यानंतर पहिल्यांदा कच्च्या साखरेवरील वर आयात कर लावण्याचे काम मोदी यांनी केले. साखरेवरची निर्यातवर सबसिडी देण्याचे काम आणि इथेनालची किमत वाढविण्याचे काम मोदी यांनी केले .
सर्व साखर कारखान्यांना एकाच नजरेने पाहण्याचे काम आम्ही करत आहोत. सहकारचे खाजगी मध्ये होऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे.
राजकीय दृष्टीने हे जो संचालक आमचे नाही बरोबर आहेत त्यांची गॉरंटी राज्य सरकार घेत नाही हे किती उचित आहे. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.मी राज्यात तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी आलो आहे असेही ते म्हणाले.यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करत पार्टीच्या दृष्टीने विचार करत राज्य सरकार कारखान्यांना आर्थिक मदत टाळत असल्याचा उल्लेख त्यांनी करून राजकीय दृष्टीने सहकाराकडे co operative, न पाहण्याचा सल्ला त्यांनी दिला. मला सल्ला देण्याऐवजी तुम्हाला जास्त जरुरत असल्याचे सांगून मी मूक प्रेक्षक बनू शकणार नाही.असाही दम त्यांनी राज्य सरकारला दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले तर आभार खासदार डॉ सुजय विखे यांनी मानले.