पाथर्डी -प्रतिनिधी
शहरात महावितरणकडून वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. वीज चोरी रोखण्यासाठी
दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.शहरातील आठ ग्राहकांवर ५ हजार सातशे तीन युनिट चोरी केल्याप्रकरणी १ लाख तीन हजार ४४० रुपये दंड केल्याची माहिती शहर सहायक अभियंता मयूर जाधव यांनी दिली आहे.
आणखी वाचा :नाग पंचमी २०२१ विविध परंपरा
शहरातील वामनभाऊ नगर, म्हस्के कॉलनी, विजयनगर, नाथनगर या भागात धडकपणे कारवाई करून दंडात्मक रक्कम भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी चोवीस तासाची मुदत महावितरणकार्यालयाकडून देण्यात आली आहे. संबंधित दंड न भरणाऱ्या ग्राहकांवर यापुढची कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.यासंदर्भात पथक तयार करण्यात आले आहे.
या पथकात प्रमुख सहाय्यक अभियंता हितेश ठाकूर, सहाय्यक अभियंता मयूर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना विभागाचे प्रवीण घोरपडे, लेखा विभागाचे प्रमुख सहदेव शिरसाठ, दीपक मुसळे, गणेश वायखिंडे, लाईन स्टाफ अरुण दहिफळे, राजू म्हस्के, नवनाथ धायताडक, कृष्णा बर्डे, राजाराम जाधव, सुदर्शन शिरसाठ ,नितीन खेडकर, लक्ष्मण वाधवणे,प्रधान तंत्रज्ञ अभिषेक अन्नदाते, ऋषीकेश शिरसाठ, , भास्कर मरकड, देविदास शेळके आदी कारवाई दरम्यान सहभागी झाले होते.